
केज । प्रतिनिधी

केज । प्रतिनिधी
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रसिद्ध रिल्स स्टार पुजा भानवसे व विनायक भानवसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन केज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सिताताई बनसोड होत्या तर प्रसिद्ध रिल्स स्टार पुजा पवार , पुजा सुरवसे, माया सोनवणे , मनिषा साखरे या होत्या . सदरील मान्यवरांच्या हस्ते या अद्यावत ब्युटी पार्लरची उद्घाटन करण्यात आले. यानंतर सितताई बनसोड यांनी महिलांच्या सौंदर्याबाबत जागरूकता वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि केजसारख्या शहरात अशा दर्जेदार सेवांची उपलब्धता होणे हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तसेच प्रियंका राऊत यांनी पार्लरमधील सेवांची माहिती दिली त्यामध्ये या पार्लरमध्ये फेशियल, हेअरस्टाईलिंग, मेकअप, स्किन ट्रीटमेंट, आणि नेल आर्ट यांसारख्या प्रगत सेवा उपलब्ध असून, आधुनिक उपकरणे आणि तज्ञ कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. “परफेक्ट ब्युटी पार्लर” केज शहरातील सौंदर्य सेवांसाठी एक नवा मापदंड ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.