आपला बीड जिल्हा

रजिष्ट्री कार्यालायच्या स्लॅबला लागली कळं ….! अधिकारी अन् नागरिकांच्या डोक्यावर पाणी थेंब थेंब गळं….!

दुय्यम निबंधक कार्यालयाच्या पोर्चला लागली गळती !

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

सरकारी कार्यालयाच्या निकृष्ट कामाचे अनेक नमुने पहायला मिळत आहेत. केज येथील मुद्रांक शुल्क नोंदणी आणि दुय्यम निबंधक कार्यालयात प्रवेश करताच कार्यालयात येणारे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या डोक्यावर प्रवेश करता क्षणीच थेंबा थेंबाने गार होण्याचा अनुभव येतो आहे.

बीड जिल्ह्यातील केज येथील तहसीलाच्या आवारात असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क, दुय्यम निबंधक श्रेणी -१ कार्यालयात प्रवेश करता क्षणीच तेथे जाणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत हे डोक्यावर पडणाऱ्या पाण्याच्या थंड पाण्याने होते.

येथील तहसील कार्यालय आवारात असलेल्या कार्यलयात तालुक्यातील नागरिकांची वर्दळ असते.

या कार्यलयाचे बांधकाम सन २०१५ मध्ये पूर्ण होऊन त्या इमारतीचे हस्तांतर झालेले आहे. परंतु प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या दिवसात कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा मधील पोर्च मधुन पाणी गळती होत आहे .

या बाबत दुय्यम निबंधक व्ही. बी. झिंगाडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला जा. क्र. /संकीर्ण/दुनि केज/२२९/२०२२ पत्राद्वारे कळविले आहे. परंतु अदयाप पर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

तरी अद्यापही बांधकाम विभागाने कार्यवाही केली नाही. त्यामुळे गळती सुरूच आहे. याकडे आता लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे आवश्यक आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!