आपला बीड जिल्हा

इसलाहे मिल्लत सेवाभावी संस्था केजच्या वतीने ” तिरंगा रॅलीचे ” आयोजन

केज मधील विविध शाळाचां सहभाग....

वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब

स्वांतत्र्यांच्या अमृत महोत्सवा निमित्त केज मध्ये इसलाहे मिल्लत सेवाभावी संस्थेच्या वतीने केजमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .

यामध्ये राजीव गांधी विद्यालय, नुरजंहा विद्यालय , स्वामी विवेकानंद विद्यालय केज आदि शाळांनी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला .

विद्यार्थ्यांच्या हातामध्ये राष्ट्रध्वज देऊन त्यांची राष्ट्र ध्वज रॅली ढोल ताश्यांच्या गजरात मौलाना आझाद चौकापासुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मंगळवार पेठ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मधुन तहसिल कार्यालयापर्यंत काढण्यात आली .

या दरम्यान केजच्या उच्चस्थ पदाधिकारी तथा सामाजीक कार्यकर्त्यानी भेटी दिल्या त्यामध्ये केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे साहेब तसेच सामाजीक कार्यकर्ते भोसले सर आदि उपस्थित राहुन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.

शेवटी रॅलीची सांगता तहसिल कार्यालय केज या ठिकाणी करण्यात आली. तसेच केजचे तहसिलदार दुलाजी मेंढके यांनी विद्यार्थ्यांना तिरंगी ध्वज लावताने घ्यावयाची काळजी तसेच ध्वजाविषयीच्या महत्वाच्या गोष्टी सांगीतल्या .

या तिरंगा रॅलीकरीता इसलाहे मिल्लत सेवाभावी संस्था केजच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!