Uncategorized

सेंद्रिय शेती काळाची गरज-सुभाष साळवे 

वादळवार्ता – केज

           जवळबन येथे शेतकरी मेळावा व्याख्यान मालेचे आयोजन कै भानुदास बाबुराव करपे यांच्या 4 थ्या पुण्यस्मरणा निमित्त करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बळीराम सोळंके भारतीय किसान संघ हे होते कालिदास आपेट शेतकरी संघटना, मार्केट कमिटी सभापती अंकुश इंगळे, प्रकल्प संचालक आत्मा सुभाष साळवे, उपविभागीय कृषि अधिकारी आबेजोगाई सूर्यकांत वडखेलकर, शात्रज्ञ कृष्णा कर्डीले,बाबुराव कणसे, नेताजी शिंदे, दिलीप करपे उपस्थित होते.सेद्रिय शेती ही काळाजी गरज बनली आहे .जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत असून, जमिनीतील सामू बदलत आहे,अयोग्य पिक पद्धतींचा वापर, रासायनिक खतांचा असमतोल वापर, अमर्याद सिंचनाचा वापर . रासायनिक खते देण्याची चुकीची पद्धत, वेळ आणि मात्रा.जमिनीचे बिघडत चाललेले भौतिक गुणधर्म,कमी होत चाललेली सूक्ष्मजिवाणुची संख्या जमिनीमध्ये वाढत चाललेल्या अव्याढव्य खताच्या प्रमाणामुळे मानवी शरीरावर, आरोग्यावर पिकावर विपरीत परिणाम दिसून येत आहेत.एक इंच सुपिक थर हा नापीक होत असून पाण्याबरोबर उपयुक्त अन्नद्रव्यांसह वाहून जात आहेत. अशा विविध कारणांमुळे जमिनीचा सुपीकता कमी होत आहे सद्य स्थितीत बाजारामध्ये अनेक प्रकारची खते उपलब्ध आहेत. त्यांच्या किंमती व त्यामधील अन्नद्रव्यांचे प्रमाण वेगवेगळे आहे. यामुळे खतांचा अवाजवी वापर टाळून जमिनीचे आरोग्य अबाधित राखणे आवश्यक आहे.सेद्रिय शेतीमधील विविध योजना जसे परंपरागत कृषि विकास योजना, जैविक मिशन,नैसर्गिक शेती, मोठया क्षेत्राचे प्रामाणिकरण,या विषयीं सुभाष साळवे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले

सेद्रिय शेतीत अनावश्यक खतांवरील खर्चात बचत झाल्याने उत्पादन खर्च कमी होऊन खर्चात बचत होणार आहे शेतकऱ्यांनी घरच्या घरी विविध निविष्ठा करून, जसे दशपर्णी अर्क, जीवाअमृत, बिजाअमृत,अवलंब करून ,गांडूळखत, सी पी पी कल्चर, पालापाचोळा, पिकाचे अवशेष,शेणखत , कंपोस्ट खत,हिरवळीच्या खतांचा वापर करून शेतीचे आरोग्य व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे याविषयी त्यांनी सांगितले.कृषि विभागाच्या विविध योजने विषयी सूर्यकांत वडखेलकर यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास गावातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!