आपला बीड जिल्हाआपले केजभ्रष्टाचार

सुकळी ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंच , ग्रांमसेवकावर फौजदारी गुन्हे दाखल करा ; सुकळी ग्रामस्थांचे बीड जिल्हापरिषद समोर आमरण उपोषण

केज तालुक्यातील सुकळी ग्रामपंचायत मध्ये सन २०२० ते २०२२ या कार्यकाळात १४ वा १५ वित्त अयोगाअंतर्गत ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करुन निधीचा अपहार करणारे सरपंच व ग्रामसेवक याच्या विरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करुण शिस्तभंगांची कार्यवाही करुन त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करावे व निधीच्या ‘भ्रष्टाचारची रक्कम संबधीताकडुन वसुल करण्यात यावी.

तसेच मौजे. सुकळी पो माळेगांव ता. केज जि.बीड येथे १४ व १५ वित्त अयोगातील निधीचा अपहार झाल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नेमलेले चौकशी समीतीतील विस्तार अधिकारी, पंचायत समिती केज व प्रभारी विस्तार अधिकारी , पंचायत समिती केज यांनी ७ ते ८ महीने होउनही चौकशी अहवाल सादर केला नसल्यामुळे व त्यांनी चौकशीला विलंब केला असल्यामुळे त्यांना निलंबीत करावे. या प्रमुख मागण्या घेऊन सुकळी येथील ग्रामस्थ शाहुराव रघुनाथ गायकवाड, अशिष कल्याणराव खाडे, पाडुरंग साहेबराव खाडे, अमर मोहनराव गायकवाड,अमोल आत्माराम खोड, ॲड. विनोद विलास काटकर , राहुल सर्जेराव वाघमारे,गणेश अंकुश गायकवाड हे बीड जिल्हा परिषद समोर आमरण उपोषणास बसले आहेत.

त्याबरोबरच जोपर्यंत संबंधितावर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरु ठेवणार असल्याचे मत उपोषण कर्त्यानी वादळवार्ता च्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले आहे .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!