आपले केज

केज नवरात्र महोत्सवात रोटरीचे सांस्कृतिक “होम मिनिस्टर” आणि डान्स स्पर्धेचे आयोजन

केज/ शेख सज्जाद

प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी नवरात्र महोत्सवात रोटरी क्लब ऑफ केज च्या वतीने “होम मिनिस्टर” आणि डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात जास्तीत जास्त महिला व कलाकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन केज रोटरीच्या वतींने अध्यक्ष प्रकाश कामाजी, सचिव अनंत तरकसबंद व संस्थापक अध्यक्ष हनुनंत भोसले यांनी केले आहे.येत्या मंगळवार दि 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक 4 वाजता “होम मिनिस्टर” कार्यक्रम पार पडणार असून यासाठी 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नावनोंदणी करता येईल. मुलामुलींसाठी “डान्स स्पर्धा” गुरुवार दि 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. डान्स स्पर्धेसाठी बुधवार दि 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. नांव नोंदणीसाठी अध्यक्ष प्रकाश कामाजी- 9860652454, हनुमंत भोसले-942373 3888, 7972058885,विकास मिरगणे-9422470 710 प्रवीण देशपांडे- 9822251 555 महेश जाजू- 9422741027 दादाजमाले-9561518333 अरुण अंजाण-9325023790 बापूराव सिंगण-942 2236139 प्रा डॉ बीजे हिरवे-9881858578 यांच्याशी संपर्क साधावा.

वरील कार्यक्रम भवानी माता मंदिर परिसरात पार पडतील.तरी केज शहरातील कलाप्रेमी नागरिक व महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केज रोटरीच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!