आपला बीड जिल्हा

केज येथे रिपब्लिकन सेनेची जिल्हा आढावा बैठक संपन्न.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व तयारीनिशी कामाला लागा–सागर डबराशे

==========================

वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षाचे नेते आता कामाला लागले असुन यासाठीची मोर्चे बांधनी सुरु झाली आहे.यात आता रिपब्लिकन सेना या पक्षानेही कंबर कसली असुन पक्षाचे सरसेनानी मा. आनंदराजजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार सर्व महाराष्ट्रभर आढावा बैठकिचे आयोजन करण्यात येत असुन बिड जिल्ह्याची आढावा बैठक रिपब्लिकन सेनेचे प्रदेश अध्यक्ष सागरजी डबरासे यांच्या उपस्थितीत केज येथे नुकतीच संपन्न झाली.

या बाबत अधिक माहिती अशी की येत्या काही दिवसातच जिल्हापरिषद, पंचायत समीती, नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका अगदी उंबरठ्यावर येवून ठेपल्याने राजकीय पक्षाचे नेते राजकीय आखाड्याच्या मैदान तयारीला लागले असुन पुढारी राजकिय समीकरणे जुवळाजळवी करत आहेत. तर आपापल्या कार्यकर्त्यांना कामाला लावल्याचे दिसत आहेत. यातच रिपब्लिकन सेनेचे सर सेनापती मा.आनंदराजजी आंबेडकर साहेब यांनीही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकीसाठी आपली यंत्रणा कामाला लावली असुन महाराष्ट्रभर आता राष्ट्रीय पातळीवरील जेष्ठांना आढावा बैठका घेण्यासाठी आदेशीत केल्याने सर्व यंत्रणा आता कामाला लागली आहे. याचाच एक भाग म्हणून दि. २२ सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी १२:०० वा.केज येथील शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष मा. सागरजी डबराशे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकिचे अध्यक्ष म्हणून मराठवाड्याचे अध्यक्ष अँड.रविंद्र पाटोळे हे होते. तर बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून रिपब्लिकन सेनेचे प्रदेश अध्यक्ष सागरजी डबरासे आणि प्रदेश संघटक यशवंत भैया भालेराव हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून परभणी जिल्हाध्यक्ष मा. राजेशकुमार सुर्यवंशी, बिड जिल्ह्याचे पुर्वजिल्हाध्यक्ष मा. बाबासाहेबजी अहिरे , बिड जिल्हा पश्चिमचे जिल्हाध्यक्ष मा. हेमंत पायाळ , जिल्हा सचिव पुर्वचे सचिव मा. आश्रुबा तुपारे, केजचे तालुकाध्यक्ष मा. गोपिनाथ इनकर, केज तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. सुष्मा चंदनशिवे, गेवराई ता.अध्यक्ष सिध्दार्थ पटेकर, यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला मार्गदर्शन करताना बैठकिचे प्रमुख मार्गदर्शक रिपब्लिकन सेनेचे प्रदेश अध्यक्ष मा. सागरजी डबराशे यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेशी बोलताना सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येवुन ठेपल्याने आपण आता स्वस्थ न बसता जबाबदारी ने कामाला लागा आपण सर्व निवडणुका लढणार असुन समविचारी पक्षाशी युती होण्याची शक्यता त्यांनी यावेळी बोलुन दाखवली. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत या निवडणुकीत आपल्याला सत्ता स्थापन कराययची असल्याने सर्वांनी आता तनमन धनाने आळस झटकून संघटनात्मक पक्षबांधनीसाठी सर्वांनी कामाला लागा असे स्पष्ट आदेश दिले आहेत. या बैठकीला उपस्थित मान्यवरांनी याच विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या बैठकिसाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे जिल्हाध्यक्ष व या बैठकीचे आयोजक मा. बाबासाहेब अहिरे व केज तालुक्याचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बैठकीत पक्ष प्रवेश आणि पद नियुक्ती 

केज येथे झालेल्या बैठकीत अशोक कोकणे यांची जिल्हा सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली तर गेवराई येथील या बोठकीसाठी आलेले संदिप सुतार आणि प्रल्हाद सुतार यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेना या पक्षात पक्ष प्रवेश केला. या बैठकीला केज तालुक्यातील पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि जयश्री मुद्दे, कल्पना लांडगे, सुरेखा वैरागे, ज्योती लांडगे, मंगल कांबळे, कमल गालफाडे, जनाबाई टिंगरे, जनाबाई ईटकर, आदी महिलांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुकाध्यक्ष मा. गोपीनाथजी इनकर यांनी केले तर जिल्हा सचिव मा. आश्रुबा तुपारे यांनी आभार व्यक्त केले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!