वादळवार्ता – केज
केज शहरात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घालता आहे. कधी शेतीतील इंधन मोटर चोरीला जातात तर कुठे मोटारसायकल तर केव्हां शासकीय इमारतीमधील चंदनाची झाडे मात्र यावेळेस तर भुरट्या चोरांनी हद्दच पार केली चक्क पत्रकराच्याच शेळीवर डल्ला मारला आहे.
या बाबत वृत्त असे कि केज येथे वास्तव्यास असनारे तथा दै. पुष्टभूमीचे तालुका प्रतिनिधी मुबाशीर खतीब यांच्या घरी पशुपालनाच्या प्रेमापोटी एका उस्मानाबाद जातीच्या शेळीचे १० वर्षापासुन संगोपन करत होते . मात्र दि.१० जुलै रोजी सायं ५.३० वाजता आज्ञात चोरट्यांनी पत्रकार मुबाशीर खतीब यांची शेळी चोरुन नेली. शेळी चोरीस गेल्यामुळे “चोर काय चोरून नेतील याचा कांही भरवसा नाही ” अशीच चर्चा मोहल्यामध्ये होत आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!