आपला बीड जिल्हाक्राईम

३४ वर्षीय महिलेचा विनयभंग, एकावर गुन्हा 

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

एका ३४ वर्षीय महिलेस हाताला धरून तू खूप आवडतेस असे म्हणत विनयभंग करीत पीडितेच्या आईस जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केज तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी एक जणां विरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

केज तालुक्यातील एका गावातील ३४ वर्षीय महिलेच्या हाताला धरून सखाराम तुकाराम सारुक रा. जोला ता. केज याने तू खूप आवडतेस असे म्हणत सखाराम तुकाराम सारुक रा. जोला ता. केज याने लज्जास्पद कृत्य करीत विनयभंग केला. तसेच तुझ्या घरा समोरुन किती चकरा मारतो, तु माझ्याकडे का बघत नाहीस. असे तो म्हणत असताना फिर्यादीच्या आईने ते ऐकून तु काय म्हणतोस? असे विचारले. त्या वेळी सखाराम सारुक याने पीडितेच्या आईस जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९:०० वाजता घडली.

अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून सखाराम सारुक याच्या विरुद्ध केज पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सपोनि शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अशोक मेसे हे पुढील तपास करत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!