बोरीसावरगाव येथे दोन गटात मारामारी : परस्परविरोधी तक्रारी दाखल
वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज तालुक्यातील बोरीसावरगाव येथे दोन गटात तुंबळ मारामारी झाली आहे दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
या बाबतची माहिती अशी की, रविवार दि.२३ ऑक्टोबर रोजी गणेश सुधाकर महाजन आणि हनुमंत शंकर कडबाने यांचे बोरीसावरगाव येथील बस स्टॅंडच्या मागील बाजूस एकमेकांच्या मोटार सायकलीचा धक्का लागला; म्हणून त्यांचे आपसात भांडण झाले.
या भांडणात गणेश सुधाकर महाजन यास हनुमंत शंकर कडबाने याने शिवीगाळ केली व जिवे मारण्याच्या उद्देशाने गणेश महाजन यांचा अभिमन्यू शंकर कडबाने याने हाताने गळा दाबला. तसेच बलभीम शंकर कडबाने याने जिवे मारण्याच्या उद्येशाने त्याचे हातातील लोखंडी वजनाचे माप गणेश महाजन यांच्या डोक्याचे मागील बाजुस मारून दुखापत केली.
तर हनुमंत शंकर कडबाने याला गणेश महाजन याने शिवीगाळ करून दगड डोक्यात मारून जखमी केले.
त्या नंतर ते दोघे युसुफवडगाव पोलिस ठाण्यात एकमेकांच्या विरुद्ध फिर्याद देण्यासाठी जात असताना एकमेकांना रस्त्यात औरंगपूर फाट्यावर अडवून पुन्हा त्यांच्यात मारामाऱ्या झाल्या.
गणेश महाजन यांच्या फिर्यादी वरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात हनुमंत शंकर कडबाने, अभिमन्यू शंकर कडबाने, बलभीम शंकर कडबाने यांच्या विरुद्ध गु. र. नं.१७७/२०२२ भा. दं. वि. ३०७, १४७, ३२४, ३२३, ५०४, ५०६ ३४ तपास पोलिस उपनिरीक्षक शेख हे करीत आहेत. तर हनुमंत कडबाने यांच्या फिर्यादी वरून गणेश सुधाकर महाजन यांच्या विरुद्ध गु. र. नं. ३७८/२०२२ भा. दं. वि. ३४१, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक राठोड हे करीत आहेत.