आपला बीड जिल्हाआपले केजसामाजीक
जि.प. शिक्षकाचा स्वच्छतेच्या ,आरोग्याच्या संदर्भांत केज नगरपंचायतच्या विरोधात यल्गार…

वादळवार्ता – केज
प्राथमिक सुविधा पुरवणे हे नगरपंचायत अधिनियम १९६५ प्रमाणे सक्तीचे आहे. मात्र केज नगरपंचायत प्राथमिक सुविधा देण्यास असमर्थ ठरत असताना दिसत आहेत.
या बाबत माहिती अशी कि केज शहरातील समता नगर येथील रहिवाशी जि.प. शिक्षक कोथिंबिरे रंगनाथ किसन हे समता नगर येथे वास्तव्य करतात ते ज्या गल्लीमध्ये रहतात त्या गल्लीतील सर्व सांडपाणी त्यांच्या घराभोवती जमा होते.
त्या सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तिनां वेगवेगळ्या आजारास सामोरे जावे लागत आहे .
त्यांनी पाठीमागील एक वर्षा पासुन या संदर्भांत वेळेवेळी केज नगरपंचायतच्या प्रशासनास निवेदन , तक्रारी दिल्या परंतु केज नगर पंचायतच्या प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही , त्यांना प्रत्येक वेळेस अश्वासनाच्या हवेमध्ये ठेवण्यात आले .
शेवटी त्यांनी एका मुलाखती व्दारे केज नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात ताशेरे ओढत तात्काळ या सांडपाण्याची व्यवस्था करावी अन्यथा नगरपंचायत कार्यालयाच्या समोर सहकुटुंब आमरण उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे.
कोथिंबिरे रंगनाथ किसन सर यांच्या सोबत समता नगर गल्लीतील सर्वजण त्यांना पाठीबा देणार असल्याचे मत स्थानिक रहिवाशी रमेश गुळभिले यांनी व्यक्त केले आहे .



