Uncategorized

म्हशी वरून बाप-लेकात वाद पेटला अन् पोरगा बापाला चावला !

वादळवार्ता – गौतम बचुटे दि.२३

म्हशीच्या वाटणी वरून बाप लेकांत चांगलेच भांडण पेटले. त्या वादातून चक्क मुलाने बापाला कडाडून चावा घेतला आणि आईला पण मारहाण केल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे.

केज तालुक्यातील टाकळी येथे बाप-लेक वेगवेगळे राहतात. दि. २१ जुलै रोजी वडिलांना त्यांची म्हैस त्यांच्या दारात आढळून आली नाही; म्हणून त्यांनी तिचा शोध घेतला असता त्यांची म्हैस त्यांचा मुलाने स्वतःच्या दारात बांधल्याचे आढळून आले. म्हणून वडिलांने त्यांच्या मुलास विचारले की, माझी म्हैस तू का बांधलीस ? तुला जमीन वाटणी करून दिली आहे असे म्हणून ते बांधून ठेवलेली म्हैस सोडण्यासाठी गेले असता; तो वडिलांना म्हणाला की, मला म्हैस विकून कर्ज फेडायचे आहे. असे म्हणून मुलाने  वडीलांना  शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांच्या दोन्ही हाताला कडाडून चावा घेतला. नंतर भांडण सोडविसाठी आलेल्या आईला देखील मारहाण केली.

ज्ञानोबा घुले यांच्या फिर्यादी वरून दि. २२ जुलै रोजी वडिलांनी त्यांच्या मुला विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ४३९/२०२३ नुसार भा. दं. वि. ३२३, ३२४, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार सुधाकर दौंड हे पुढील तपास करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!