आपला बीड जिल्हा

शेतकर्यांचे सरसकट विमा,अनुदान व ओला दुष्काळ जाहीर करा,पालकमंत्रीला दिले निवेदन

वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब

मौ.आझाद युवा मंचा आंदोलन चा ईशारा

माजलगाव- बीड जिल्ह्याचे शेतकर्यांचे हाल होत असून नैसर्गिक मारमुळे शेतकरींना रडु कोसळला असुन राज्य सरकारने शेतकर्यांचे सरसकट विमा, अनुदान तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावे ह्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अतुलजी सावे यांना मौलाना आझाद युवा मंच तर्फे निवेदन दिले तसेच शेतकर्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावे नसता मौ.आझाद युवा मंच रस्त्यावर येवून आंदोलन करु असा इशारा दिला.

                   संपूर्ण बीड जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली व त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये 30 ते 35 दिवस पाऊस पडला नव्हता त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन पिकांची वाढ खुंटली आहे. सोयाबीनचे फुलगळ झाली आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.

काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी अनुदान यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामधून बीड जिल्ह्यांना वगळण्यात आले आहे तसेच पिक विमा खरीप 2022, 25 टक्के अग्रीम साठी जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळी व सोयाबीन सोडता सगळीच पिके वगळण्यात आली आहेत. या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी बीड जिल्ह्याचे खासदार प्रीतम ताई मुंडे तथा पालकमंत्री अतुलजी सावे यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की सरकारशी बोलून हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत. बीड जिल्ह्यावर झालेल्या अन्यायला गाळून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व नागरिकांना न्याय द्यावा.

 या वेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष नुमान अली चाऊस, तालुकाध्यक्ष फेरोज भाई इनामदार, युवक तालुका उपाध्यक्ष वाजेद शेख, युवक शहराध्यक्ष साबेर भाई कुरेशी, अशोक मेंडके सर, फैजान भाई शेख व आदी उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!