खळखळाट
नगर हिताय – नगर सुखाय हे ब्रिद ठेवले बाजुला ।
स्वःता हिताय स्वःता सुखाय असे म्हणत कामकाज सुरु केले भितीच्या आडबाजुला ।
बोअरवेल बंद , जोपासुन छंद पाणी सोडले २० दिवसाला ।
स्वच्छतेची अस्वच्छता झाली मजुरांची गरज भासली ! शहरातील मजुर सोडुन मजुर अनायला गेले बसू कल्याण कर्नाटकाला ।
स्वःता हिताय स्वःता सुखाय कामकाज सुरु केले भिंतीच्या आडबाजुला ।
वादळवार्ता वार्तांकन – अजय भांगे
केज शहरात जवळपास 30 हजार लोकसंख्या आहे एकुण 17 प्रभाग आहेत . केज शहरातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची सांडपाण्याची कमतरता भासु नये म्हणुन केज नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने टप्याटप्याने एकुण 17 प्रभागामध्ये 189 इंधन विहीर ( बोअरवेल )घेतल्या आहेत. सध्या केज नगरपंचायतच्या अंतर्गत धनेगाव पाणीपुरवठ्याच्या माध्यमातुन केज शहराला दर 15 ते 20 दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो .
मधल्या काळामध्ये बोअरवेलच्या माध्यमातुन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भागवला जातो मात्र केज नगरपंचायतच्या अंतर्गत स्व:ताच्या मालकीच्या असणाऱ्या 189 इंधन विहिर पैकी प्रत्येक प्रभागामधील आरध्याच्या वर इंधन विहिर (बोअरवेल ) बंद पडलेल्या आहेत.
कांही बोअरवेल दुरुस्त करण्यासाठी टाकल्या त्या आद्यापर्यंत बसविल्या गेल्या नाहीत कांही प्रभागा मधील पाटील गल्ली , लोंढे गल्ली , देशपांडे गल्ली , फुलेनगर , रोजा मोहल्ला , दर्ग्याच्या पाठीमागील, समता नगर , क्रांतिनगर , आहिल्यानगर , धारूर रोड मधील इंधन बोअरवेल बंद पडल्या आहेत. केज शहरातील असंख्य बोअरवेल बंद पडल्या असलेमुळे नागरीकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. परंतु सुस्त प्रशासन सत्ताधारी सपशेल दुर्लक्ष् करत आहेत.
प्रत्येक प्रभागातील नागरीक बोअरवेल दुरस्त कधी होतात याची वाट पाहात आहेत.
केज नगरपंचायतचे प्रशासन वा सत्ताधारी याकडे लक्ष देतील का ? की केज शहरातील नागरीकांचे पाण्यासाठी असणारे हाल बघत राहतील ? यांकडे सर्वांच लक्ष लागले आहे.