आपला बीड जिल्हा

कार- दुचाकीचा भीषण अपघातात एक ठार

बीड वादळवार्ता वार्तांकन – गणेश ढाकणे

कार आणि दुचाकीचा समोरा- समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मांजरसुंबा पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील मौजे महाजनवाडी फाट्यावर शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सागर सतिश चव्हाण पुणे वरून अंबाजोगाईकडे  वाहन क्रमांक एमएच ०६ सीडी २७५७ जात असताना

मौजे महाजनवाडी फाट्यावर  मोटारसायकल स्वार वाहन क्रमांक एमएच २३  बी ई ३३ ९८ युनिकाॅर्न गाडीचा समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीस्वार याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघात मृत्यू झालेल्या तरुण हा अजय बबन तायेड  (वय  २३ ) वर्षे असं मृत तरुणाचं नाव असून तो पाटोदा तालुक्यातील  वाघिरा गावचा असल्याचे समजते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!