बीड (प्रतिनिधी)
दि.06.12.2024 रोजी केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत कमलाकर महाजन यांनी दलित वॉचमन अवादा कंपनी-मस्साजोग यांची फिर्याद घेतली नाही, त्यांनी कायदेशीर कर्तव्य बजविण्यास कसूर केला आहे त्यामुळे अॅट्रोसिटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संविधान रक्षकचे राजेश सोनवणे, रा.मस्साजोग यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.यावेळी मनिषा तोकले, मंदा मस्के, पंचशिला सरपते, मनिषा पायाळ, सुरेश सोनवणे, भागवत वाघमारे, बाळासाहेब सोनवणे यांनी आज दि.10 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक, बीड यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदन दिलेले आहे.
याबाबत माहिती अशी की, दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी सदरील अवादा कंपनीचे वॉचमन अशोक सोनवणे, भैय्यासाहेब सोनवणे , अमरदीप सोनवणे यांनी व राजेश सोनवणे यांनी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना भेटुन त्यांना विनंती केली की, गेटवरील मुले माझी म्हणजे राजेश सोनवणे यांचे चुलत भाऊ आहेत आरोपीने त्यांच्या गळ्यातील ओळखपत्रावरील नांव वाचुन त्यांची जात समजल्यावर त्यांनी माझ्या चुलत भावंडांना मारहान तसेच सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ केली आहे, तुम्ही अॅट्रॉसिटीची केस मारहान झालेल्या तीन दलीत वॉचमन पैकी एकाची फिर्याद घ्या, तेव्हा पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन म्हणाले की, मला काही व्यक्तीचा दबाव आहे की तुम्ही अॅट्रॉसिटी केस दाखल करु नका आणि सुदर्शन घुले व इतर लोकांच्या विरुध्द साधी मारहानीची केस करुन घेतली यावेळी मी व पिडीतांनी प्रशांत महाजन यांना खुप वेळा विनंती केली, परंतु त्यांनी आमची अॅट्रॉसिटीची फिर्याद दाखल न करता आम्हाला पोलीस स्टेशन मधुन हाकलुन देऊन माझा सार्वजनिक ठिकाणी अपमान केलेला आहे.
प्रशांत महाजन यांनी राजकीय व्यक्तीशी संगणमत करुन मारहान झालेल्या पिडीत व्यक्तींना नुकसान पोहचविण्यासाठी कायद्याची अवज्ञा केली आहे. कायद्याच्या निर्देशाची अवज्ञा करुन कर्तव्य बजविण्यास कसुर केलेला आहे. त्यांनी अॅट्रॉसिटीची केस नोंद न करता मारहानीची साधी केस करुन पिडीतांना क्षती पोहचविण्याच्या उद्देशाने चुकीचा दस्ताऐवज तयार केलेला आहे. प्रशांत महाजन यांनी स्वतःच्या कायदेशीर अधिकाराचा वापर दलीत व्यक्तीला क्षती पोहचेल अशा प्रकारे शासनाला दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी खोटी माहिती दिली आहे. तसेच सराईत गुन्हेगारांना अॅट्रॉसिटीच्या गंभीर शिक्षा पासुन वाचविण्याची कृती केली, त्यामुळे दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख, रा. मस्साजोग यांचे अपहरण करुन निघृण हत्या केली आहे.
तरी प्रशांत महाजन यांच्यावर तात्काळ अॅट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करावा अन्यथा प्रशांत महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास तात्काळ आम्हाला परवानगी द्यावी अशी मागणी राजेश सोनवणे यांनी जिल्हाधिकारी बीड आणि पोलीस अधिक्षक बीड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!