मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात :आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी
केज/गौतम बचुटे
देवदर्शनासाठी आलेल्या चुलत आजोबावर गणेश मंदिराच्या परिसरात कोयत्याने तेरा वार करून जागीच खून केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या खून प्रकरणी मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.
दि. ५ मार्च मंगळवार रोजी केज येथील कानडी रोडवर असलेल्या सिद्धी विनायक गणेश मंदिरात केज येथील गिरधारीलाल किसनलाल शिल्लक वय (५८ वर्ष) हे मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. ते सकाळी ७:३० वा. देवदर्शन करून मंदिराच्या बाहेर येत असताना मंदिराच्या बाजूला दबा धरून बसलेला त्यांच्या पुतण्याचा २५ वर्ष वयाचा मुलगा नात्याने त्यांचा चुलत नातू रोहित रतन शिल्लक (रा. केज) याने मंदिराच्या जवळ असलेल्या आडबाजूला रिकाम्या जागेत ओढत नेऊन धारदार शस्त्राने डोक्यात व मानेवर सपासप वार करून जागीच खून केला होता. सदरील खून हा जागेच्या वादातून झालेला आहे.
मयत गिरधारीलाल शिल्लक यांचा मुलगा सागर शिल्लक यांच्या तक्रारी वरून रोहीत ऊर्फ लक्की रतन शिल्लक याने धारदार कोयत्याने वार करून खून केला तर रामनिवास रामकरण शिल्लक, रतन रामनिवास शिल्लक दिपक रामनिवास शिल्लक या तिघांनी त्याला चिथावणी दिली म्हणून केज पोलीस ठाण्यात चौघा विरुद्ध गु र नं १०७/२०२४ भा दं वि ३०२, १३०-ब, १०७ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला .या खळबळ जनक खून प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे पुढील तपास करीत आहेत.
काय होते जागेचे प्रकरण ?
मयत गिरधारीलाल शिल्लक यांचे वडील रामकरण शिल्लक यांचे नावे केज शहरात मेन रोड येथे मालमता क्र. १९३० होती. रामकरण शिल्लक हे मयत झाल्या नंतर सदरची मालमता ही गिरीधारीलाल आणि त्यांचा भाऊ रामनिवास शिल्लक यांचे नावावर समान हिश्याने नीद झाली. त्या प्रमाणे त्याचा उपभोग गिरीधारीलाल आणि रामनिवास हे दोघे घेत होते. त्या नंतर सन २०१६ मध्ये गिरीधारीलाल यांनी कर्ज काढते वेळी पी आर कार्डची आवश्यकता आसल्याने पी आर कार्ड काढण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय, केज येथे जाऊन पीआर कार्ड काढले असता गिरीधारीलाल यांच्या लक्षात आले की, रामनिवास यांने वारसा आधारे त्या मानमतेवर त्यांचे स्वतःचे नाव लावले. त्यामुळे गिरीधारीलाल यांनी जिल्हा भुमी अभिलेख कार्यालय, बीड येथे दाद मागितली. त्या वरून रामनिवास यांचे नाव कमी झाले होते. सदर मिळकती बाबत गिरीधारीलाल यांनी मा. केज न्यायालयात दिवाणी दावा नं. ४८४/२०१८ दाखल
करुन त्यामध्ये मनाई हुकूमनाम्या आधारे हक्कात मंजूर झाला होता. रामनिवास यांनी त्याच दाव्यात प्रति दावा दाखल करून त्यांनी मनाई दावा मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु त्यांचा अर्ज न्यायालयाने नामंजूर झाला होता. म्हणून त्यांचा पुतण्या रतन व दिपक, भाऊ रामनिवास, चुलत नातू रोहित उर्फ लक्की शिल्लक यांचा त्यांच्यावर राग होता. ते सर्वजण नेहमी अधुन मधुन शिवीगाळ करायचे आणि पोलीस ठाणेला तक्रार दिल्यास तुम्हाला व मुलाला खल्लास करून टाकू अशी धमकी देत होती. गिरीधारीलाल यांच्या हिश्याच्या अर्ध्या जागेची डागडुजी व दुरुस्ती करण्या करीता परवानगी मागील घेतली होती. त्यावेळी देखील त्यांना पोलीस बंदोबस्त मिळू नये म्हणून त्यांनी अडथळा आणला होता. परंतु हे काम कायदेशीर असल्याने पोलीस बंदोबस्त मिळाला होता. तेव्हा पासून रतन, दीपक व रोहीत उर्फ लक्की हे त्यांना सतत शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देत होते.तसेच मागील महीन्यात गिरीधारीलाल व त्यांचा मुलगा सागर हे त्यांच्या दुकानात असतांना रतन व दिपक व रोहीत ऊर्फ लक्की यांनी कोर्टातील दावा काढून घे म्हणून धक्काबुक्की केली होती. दावा काढून घेतला नाही; तर त्यांचा करू मर्डर अशी धमकी दिली होती. परंतू गिरीधारीलाल यांनी दि. २२/२/२०२२ रोजी केज कोर्टात हजर होऊन दावा काढुन न घेता तारीख वाढवुन घेतली होती. त्या दिवशी पण तिघांनी घरी जाऊन रात्री येऊन तु दावा का मागे घेतला नाही तर खल्लास करू अशी धमकी दिली होती.
आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी !
खून प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला मुख्य आरोपी रोहित उर्फ लक्की शिल्लक याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. ११ मार्च पर्यंत पाच दिवसांचा पोलीस कोठडी सुनावली आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!