वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे
पत्नी व तीन मुलासह सासुरवाडीला आलेला जावई कुणालाही काही न सांगता बेपत्ता झाला असल्याची तक्रार सासऱ्याने पोलीस ठाण्यात केली आहे.
या बाबत माहिती अशी की, दि. ७ जुलै रोजी परळी येथील सतीश विष्णुदास वाधवणे व त्यांची पत्नी जया हे त्यांच्या तीन मुलासह साळेगाव ता. केज येथे सासुरवाडीला आले होते. ते सर्वजण दोन आठवडे साळेगाव येथे राहिले आणि दि
२२ जुलै रोजी पहाटे सतीश विष्णुदास वाधवणे हे अचानक कोणालाही न सांगता आणि त्यांचा मोबाईल पत्नीकडे देऊन बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध नातेवाईकांकडे घेतला असता ते आढळून आले नाहीत. म्हणून त्यांचे सासरे ज्योतिकांत कलसकर यांनी केज पोलीस ठाण्यात जावई सतीश वाधवणे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!