पतीने वेळोवेळी दिले प्रोत्साहन – माधवी वाघचौरे
वादळवार्ता – केज
जिद्द, मेहनत आणि चिकाटी असली तरच परिस्थीवर सुद्धा मात करता येते. हे केज येथे रस्त्यावर चहाची टपरी चालुवून कुटुंबाचा उदर निर्वाह करणाऱ्या एका चहावाल्याच्या बायकोने सिद्ध करून दाखविले आहे.
केज येथील केज-बीड रोडवर पोलीस ठाण्याच्या शेजारी रस्त्यावर चहाची टपरी चालवून बालाजी पाचपिंडे हे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. या शिवाय त्यांना उदरनिर्वाहाचे इतर कुठलेली साधन नाही आणि त्यांना स्वतःचे घर देखील नाही. ते केज येथील महात्मा जोतिबा फुले नगर मध्ये भाड्याच्या एका छोट्या खोलीत राहतात पतीला हातभार लावण्याकरीता माधवी पाचपिंडे-वाघचौरे हिने पहिले ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली त्याबरोबरच तिने पोलीस भरतीची तयारी सुरू ठेवली. त्यासाठी तिने धावणे व व्यायाम याचा सराव सातत्याने केला आणि लेखी परीक्षेसाठी इंग्रजी, गणित व सामान्य ज्ञान याचाही अभ्यास केला. यासाठी
पती बालाजी पाचपिंडे यांनी प्रोत्साहन दिले.जिद्द चिकाटी सातत्य संघर्ष यांच्या जीवावर माधवी हिची मुंबई पोलिसात पोलीस कॉन्स्टेबल आणि चालक या दोन्ही पदावर निवड झाली असून ती लवकरच प्रशिक्षणासाठी रुजू होणार आहे. या निवडी बद्दल या पती- पत्नींचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!