आपला बीड जिल्हाआपले केज

केज तहसिलीचा ” अजब गजब कारभार ” पत्र दिले यावर्षी ; पत्रावर तारीख पुढील वर्षाची

वादळ वार्ता – केज

प्रशासनात काम करणारा प्रत्येक कर्मचाऱ्याने सर्वसामान्य जनतेचे कार्यालयीन कामे वेळेवर तसेच पारदर्शकपणे करावी यासाठी महाराष्ट्र शासन , केंद्र शासनाकडून वेळोवेळी आदेश निर्गमित केले जातात.

    सर्वसामान्य माणसांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाते . कागदपत्रांची अचुक कामे करणे हे कर्मचार्‍यांचे कर्तव्य आहे. परंतु याकडे कांही कर्मचारी गंभीरतापूर्वक न पाहता “लगे रहो ” अशीच भूमीका घेताना दिसत आहेत.

या बाबत माहिती अशी केज तहसिल कार्यालयामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये स्टीलचा वापर न केल्यामुळे रस्त्याला जागो जागी भेगा , तडे गेल्याचे निवेदनाव्दारे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ तथा बीड जिल्हाधिकारी यांना केज तहसिल कार्यालया मार्फत दि.17/04/2023 रोजी अर्जदाराने निवेदनाव्दारे तक्रार केली होती. त्याचे प्रतीपत्र आ.जा. क्र.2023/ संकिर्ण/ नौ.अ./ कावी-326 तहसिल कार्यालयाच्या वतीने संबधित अर्जदारास पाठवले असता त्यावर तारीख चक्क पुढील वर्षाची म्हणजे 19/04/2024 रोजीची नमुद केली आहे म्हणून केज तहसिल कार्यालयातील कांही कर्मचारी शासकीय कामकाज किती कर्तव्यदक्षपणे व अचुक करत आहेत याचेच एक जिवंत उदाहरण पहावयास मिळते आहे .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!