आपले केज

केज आंबाजोगाई रोडवर कार – मोटार सायकलचा अपघात

वादळवार्ता – अपघात वार्ता

केज – अंबाजोगाई रस्त्यावर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी कि केज – अंबाजोगाई रोडवर केजहुन अंबाजोगाई कडे जाणाऱ्या कारचा व अंबाजोगाई वरुन केजकडे येणाऱ्या मोटारसायकलचा ढाकेफळ जवळ असणार्‍या पुलाजवळ 2.50 ते 3 च्या दरम्यान अपघात झाला आहे. सदरील कारचा चालक सतिश गंगाधर जाधव रा.सातुरी तालुका पालम जिल्हा चंद्रपुर याच्या कारने धडक दिल्यामुळे मोटरसायल चालक केज तालुक्यातील देवगाव येथील बंडु नामदेव मुंडे हे जखमी झाले आहेत .

या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे पोलीस जमादार शेटगे व पोलीस जमादार राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली .

मोटार सायकलस्वार बंडु नामदेव मुंडे जखमी झाले असून त्यांना केज येथील उपजिल्हा रुग्नालय प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीड येथे पाठवण्यात आले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!