वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज तालुक्यातील टाकळी शिवारातील शेतातून सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतानाही तीन टायरची चोरी झाली आहे.
टाकळी शिवारातील राजाभाऊ घुले यांच्या शेतातील फवारणी करण्याच्या टँकरचे दोन टायर व ट्रॅक्टर ट्रॉलीचे एक टायर आणि लोखंडी अँगल यांची चोरी झाली आहे. विशेष म्हणजे जिथे चोरी झाली त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. परंतु ज्यावेळी चोरी झाली त्यावेळी तेथील लाईट गेल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते.
या प्रकरणी शिवराम घुले यांच्या फिर्यादी वरून दि. २ फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात गु र नं ५५/२०२३ भा दं वि ३८९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक दिलीप गित्ते हे पुढील तपास करीत आहेत