आपला बीड जिल्हा

करोडो रुपयांच्या केज पंचायत समितीच्या इमारतीवर कोण मारतय पिचकारी ?

वादळवार्ता वार्तांकन – अजय भांगे

केज तालुक्यातील असंख्य ग्रामपंचायत अंतर्गत त्या त्या गावाचां विकासाचा म्हणजेच रस्ते, नाल्या , घरकुल ,पथदिवे,पाणी, आदिचां कारभार करणारी पंचायत समिती आहे. प्रत्येक खेड्यातला माणुस आपले काम घेऊन थेट पंचायत समीती गाठतो केज शहरात आल्या नतंर त्याच्या समोर उभी रहाते ती भव्यदिव्य शासकीय निधीतुन करोडो रुपये खर्च करून, रंगरांगोंटी करून उभी केलेली नवी सुसज्ज इमारत.

तशी पंचायत समीती केजची भव्य इमारत नवीनच आहे. मात्र त्या इमारतीला पान, गुटका, खैनी , तंबाखु खाऊन पिचकार्‍या मारुण लालीलाल करण्याचा प्रयत्न होतोय.

इमारतीमध्ये प्रवेश करुण डाव्या बाजुने दुसऱ्या मजल्यावर जात असताना भिंतीवरचे मनमोहक आश्या द्रश्यावर नजर जाते. जनु भिंतीच म्हणत असावी मारा पिचकारी ! वरती गेल्यानतर बाहेरच्या खिडक्यातुन हवा खेळती रहाण्यासाठी असणाऱ्या प्रत्येक खिडकी बाहेर पिचकार्‍या मारून रंग भरलेला दिसतो जणु खिडकी म्हणत आसावी मारा पिचकारी. खिडकीतुन बाहेर डोकावले तर खालती असणारा ओट्याचा रंग संपुर्णता लाल झालेला आहे.

मग ज्या कर्मचार्यांचे खिडकी शेजारी टेबल आहेत कदाचित ते तर मारत नसतील ना पिचकारी ?

कोण मारत असतील पिचकारी ?

निश्चितच जर आणखी कांही दिवस केजचे गट विकास अधिकारी मोराळे यांनी लक्ष दिले नाही तर सपूर्ण इमारत लालीलाल झाल्याशिवाय राहणार नाही.

केजच्या वैभवामध्ये भर घालणारी पंचायत समितीची भव्य इमारत कांही दिवसात गुटका,पान,खैनी,जर्दा खाऊन पिचकार्‍या मारणाऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य तर होणार नाही ना ?

 

आसा प्रश्न केज शहरातील, तालुक्यातील नागरीकांना पडला आहे .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!