आपला बीड जिल्हासामाजीक

घार उडे आकाशी , चित्त तीचे पिलापाशी  या उक्ती प्रमाणेच कार्य करणारे श्रीकृष्ण पांडूरंग ढाकणे

समाज हिताची जाण आणि गावाबद्दल चांगले कार्य करण्याची इच्छा याच माध्यमातून होत असलेले परिवर्तनीय कार्य करणार व्यक्तिमत्त्व

वादळवार्ता – परळी प्रतिनिधी

माणसाने कितीही उत्तुंग अशी भरारी घेतली तरी आपण जिथे जन्मलो त्या मातीचे ऋण कधीही विसरू नये याची सतत जाणीव ठेवून अस्वलअंबा गावातील श्रीकृष्ण व गोविंद पांडूरंग ढाकणे सदैव समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असतात.  यातील पुढचे पाऊल म्हणून अस्वलअंबा गावातील प्रत्येक कन्येच्या विवाहास अकरा हजार रूपये कै पांडूरंगजी ढाकणे यांच्या स्मरणार्थ देण्याचा संकल्प केला असुन दि. १३ मार्च रोजी चि,सौ.का.कविता सुभाष काजगुंडे यांच्या विवाहास अकरा हजार रू मातोश्री कुशावर्ती पांडूरंग ढाकणे, गोविंद पांडूरंग ढाकणे व ग्रामंचायत सदस्य अंजली दत्तात्रय ढाकणे यांच्या हस्ते देवून सदरील नवीन समजउपयोगी कार्यास सुरूवात करण्यात आली , प्रत्येक गावामध्ये श्रीकृष्ण व गोविंद ढाकणे यांच्या सारखे पूत्र निर्माण झाले तर गावाचा सर्वांगीण विकास होण्यास वेळ लागणार नाही. अस परळीच्या पंचक्रोशीत चर्चांना उधाण आले आहे.

स्वखर्चातून विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे बांधकाम असेल गावातील लहान थोरांना बसण्यासाठी गावात सुसज्ज बैठक व्यवस्था, गावातील सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्यासाठी स्वतंत्र जागा त्याचबरोबर गावात 15 लाख खर्चून भव्य असे शेड त्यांनी गावासाठी आणि गावाच्या कामासाठी करून दिले अशी एक ना अनेक समाज आणि गाव हिताची कामे त्याने कुठल्याही स्वार्थविना गावसाठी आपण गावाचे काहींना काही देणे लागतो याच उदात्तहेतूने करून दाखवली आहेत

पूर्वीची कुठलीच धनदांडगी पार्श्वभूमी नसताना स्वकर्तुत्वाने निर्माण केलेले यश आणि त्यावरती कुठल्याच प्रकारचा गर्व न करता उलट समाज हिताची कार्य त्यांच्या माध्यमातून होत आहेत, आणि अशीच पुढे होत राहतील असा विश्वास गावकऱ्यांच्या वतीने केला जात आहे .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!