आपला बीड जिल्हानैसर्गिक

मांजरा धरण 90% भरले;नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

विसर्ग अलर्ट

वादळवार्ता वार्तांकन – केज

बीड,लातूर,उस्मानाबादसह( धाराशिव) अनेक गावांची तहान भागवणारे मांजरा धरण अखेर 90% च्या पुढे सरकले आहे.त्यामुळे पाण्याची आवक पाहता मांजरा धरणाचे द्वार उघडून पाणी नदीपात्रात सोडावे लागण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने मांजरा धरणाचे शाखाधिकारी यांनी कळंब/केज/अंबाजोगाई/लातूर/रेणापूर/निलंगा येथील तहसिलदार यांना प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा ही विनंती केली आहे.

 मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे तसेच धरणात येणारी जास्तीची आवक पाहता मांजरा धरणातून द्वार परिचालन आरखड्या नुसार धरण 100% व पाणी पातळी 642.37 मी. झाल्यावर येणाऱ्या पाण्याची आवक पाहता मांजरा धरणाचे द्वार उघडून पाणी नदीपात्रात सोडावे लागण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे तसेच येणाऱ्या पाण्याच्या आवक नुसार सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात कमी अधिक वाढ करण्यात येऊ शकते त्यामुळे सदर कालावधीत कुणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये या करिता प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा ही विनंती शाखाधिकारी, पूर नियंत्रण कक्ष, मांजरा प्रकल्प धनेगाव यांनी केली आहे.

मांजरा प्रकल्प धनेगाव पाणी पातळी

दि. 14/10/22

वार :- शुक्रवार

वेळ :- सकाळी 8:00 वाजता.

📍 पाणीपातळी :- 642.00 मी./642.37 मी.

📍 एकूण पाणीसाठा दलघमी = 207.128/224.093

📍 जिवंत साठा दलघमी =169.998/176.963

📍 जिवंत पाणीसाठा टक्केवारी : 90.41%

📍 धरणातील आवक : 122.91 घनमीटर/सेकंद

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!