जे.के.फक्शन हॉल येथे घेतला होता कार्यकर्त्यांचा महामेळावा केला होता पृथ्वीराज साठे यांना विजयी करण्याचा निर्धार
केज । सचिन भालेराव
केज विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी संपली आता उत्सुकता लागली आहे ती उद्याच्या निकालाची तथापि जर महविकास आवडीचे पृथ्वीराज साठे विजयी झाले तर दलितांचे, कष्टकऱ्यांचे जेष्ठ नेते संदिपान तात्या हाजारेच खरे मानकरी असणार आहेत.
या बाबत माहिती अशी कि केज विधानसभा मतदार संघ हा अनुसूचीत जाती करीता आरक्षीत असणारा मतदार संघ आहे त्यामध्ये महाविकास आघाडी कडून पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी मिळाली होती. केज शहर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय लोकांची संख्या आहे . संदिपान तात्या हजारे यांनी रिपब्लीक पार्टी ऑफ इंडिया च्या माध्यमातून अनेक वर्षापासुन शहर तथा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अनेकविध कामे केली नव्हे तर दलितांच्या चळवळी च्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते आपल्याशी वा पक्षाशी जोडण्याची कामे केली. तथापि केज विधानसभा २०२४ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे विजयी होण्याचा संकल्प तथा निर्धार संदिपान तात्या हाजारे यांनी केला. त्यासाठी निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान फुले नगर येथील जे.के. फक्शन हॉल येथे त्यांनी कार्यकर्त्याच्या महामेळाव्याचे आयोजन केले त्यासाठी शहर तथा तालुक्यातील हजारो कार्यकर्ते निळे फेटे घालून जे.के . फक्शन हॉल येथे दाखल झाले. याच महामेळाव्यामध्ये त्यांनी प्रत्येक शहरातील तथा तालुक्यातील कार्यकर्त्यांना आपल्या अनुभवानुसार कामे सोपवली .त्याच पद्धतीने कार्यकर्त्यांनीही कामे केलेली आहेत. महामेळाव्यामध्ये अपल्या मनोगतात त्यांनी म्हटले होते की पृथ्वीराज साठे यांना विजयी करणारच त्यामुळे जर उद्याला पृथ्वीराज साठे विजयी झाले तर दलितांचे, कष्टकऱ्यांचे नेते संदिपान तात्या हाजारे खरे मानकरी असणार आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!