आपला बीड जिल्हाशेतकरी
मुंडे कुटुंबाचा सात दिवासापासुन दरीत पडलेला बैल वाचेल का ?
धारूर तालुक्यातील काटेवाडी डोगराच्या दरीत घसरून पडलेल्या बैलाची , त्याच्या शेतकरी मालकाची करुण कहाणी..
बैलाचा जीव वाचवण्यासाठी मुंडे कुटुबाची धडपड ; दरीत बिल्सलरीच्या बॉटलने पाजतायत ..
वादळवार्ता वार्तांकन – अजय भांगे
धारूर तालुक्यातील काटेवाडी गावापासुन 6 किमी च्या अंतरावर असणाऱ्या डोगराच्या दरीत मुंडे कुटुबांचा बैल अतिवृष्टी झाल्याने डोगरातील कडे शेवाळ्यामुळे 31 अक्टोबर रोजी खाली पडला . उंचावरून बैल खोल दरीत पडल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात पाठीच्या मनक्याला दुखापत झाल्याने तो जागेवरून उठु शकत नव्हता . बैलापर्यंत जाणेसाठी काटया – कुपाट्याचा घसरता रस्ता करत त्यांच्या पर्यंत जानेसाठी मोठे परिश्रम करावे लागत आहे. परंतु शेतकरीराजाचा जोडीदार दरीत खोल सोडुन राहणे बालासाहेब एकनाथ मुंडे यांना शक्य नव्हते म्हणुन बैलाला वाचवायचेच ठरवले व सुरु झाला त्यांचा संघर्ष.
सुरुवातीला बैलासोबत राहुनच बैलाला चारा पाण्याची व्यवस्था केली . डोंगराच्या दरित पाण्याची व्यवस्था नसलेमुळे त्याचबरोबर रस्ता नसलेमुळे त्याला पाणी पाजण्यासाठी बिल्सरीचा वापर केला . शेतकरी राजा रात्रीसुद्धा बैलासोबतच रहात आहेत.
महत्वाचे म्हणजे बैलाला पाणी पिण्याची त्या दरीत व्यवस्था नसल्यामुळे त्यांला बिल्सरीची बॉटल प्रति एक माणुस घेऊन काट्या कुपाटयाने घसरत्या रस्त्यावर चालत बैलाची तहान भागवावी लागत आहे.
इतक्यावरच मुंडे कुटुंबिय थांबले नाही तर त्यानी तात्काळ पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मसने यांच्याशी संपर्क साधुन बैलाला वैद्यकिय सेवा व तपासण्या करण्यासाठी दरित घेऊन गेले . बैलाची तपासणी केली औषध दिले परंतु बैल उठने अशक्य होते.
त्यानंतर शेतकरी बालासाहेब मुंडे त्यांचे कुटुबिय थेट काटेवाडीचे तलाठी गोरे यांच्या कडे गेले त्याची भेट घेतली तलाठी यांना सर्व हकीकत सांगुन त्याच्यामार्फत जागेवर दरीत जाऊन पंचनामा केला मात्र आनखीन देखील कोणतीही मदत मिळाली नाही .
आज रोजी सात दिवस झाले आहेत . शेतकरीराजाचा बैल दरीत पडुन मुंडे कुटुंबीय नित्य नियमाने बैलाला वाचविण्याचे प्रयत्न करत आहेत . प्रशासनाने पंचनामा करूण आज चार दिवस झाले परंतु आद्यापर्यंत धारूर तालुक्याचे तहसिलदारांच्या मार्फत बैलाला वाचविण्याच्या संदर्भात हालचाल दिसुन आलेली नाही ना कोणती मदत.
मुंडे कुटुंबीयांनच्या बैलाला वाचविण्याचा संघर्ष यशस्वी होईल का ? धारूरचे स्थानिक प्रशासन वा महसुल प्रशासन मदत करतील का ? शेतकर्याचा बैल जीवंत राहिल का ? असे विविध प्रश्न परिसरातील नागरीकांत होतं आहेत.
शेतकर्यास मदतीची आवश्यकता आहे संपर्क साधा 8421420155