आपला बीड जिल्हा

राष्ट्रीय मार्गामार्गाच्या कामामध्ये भ्रष्टाचाराच्या उघड झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रातुन प्रकाशीत होताच मुख्याधिकारी रवि कुमार 2 महिन्यापासुन ऑफिस बंद करून फरार

२ महिन्यापासुन अंबाजोगाई येथील कार्यालय बंद

रस्त्याच्या कामांची गुणवत्ता वाऱ्यावर ; करोडो रुपयांचा भ्रष्टाचार

केज शहरामधुन जाणारा राष्ट्रीय महामार्ग त्या महामार्गाचे तब्बल तीन वर्षापासुन काम एच.पी.एम कपंनीच्या माध्यमातुन अतिशय संत गतीने होत आहे आहे. त्यामध्येही त्या त्या स्थानिक ठिकाणी असंख्य गुत्तेदारामार्फत कामे करुन घेतली त्यामुळेच सदरील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली असल्याचे दिसुन येत आहे त्यामध्ये प्रामुख्याने कामामध्ये स्टीलचा वापर न केल्यामुळे जागोजागी राष्ट्रीय महामार्गाला गेलेले तडे, भेगा , चिरा तसेच रस्ता जागोजागी खचने हे यावरून स्पष्ट होते आहे. त्यामध्ये भर म्हणुन कि काय मुख्याधिकारी रवि कुमार यांच्या आर्शीवादाने परत राष्ट्रीय माहमार्गा लगत असणार्‍या गावानंकडे जाणार्‍या रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे. सदरील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची गुणवत्ता तपासणे हे मुख्याधिकारी रवि कुमार यांचे काम होते परंतु त्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे संपूर्ण रस्त्याची वाट लागली आहे . आणी विशेष म्हणजे मुख्याधिकारी रवि कुमार मागील 2 महिन्यापासुन फरार आहे. रविकुमारच फरार असल्यानंतर कन्सल्टिंग NPCE कंपनी कशाची गुणवत्ता तपासुन कशाची बिले काढत आहे. याची विभागीय चौकशी करावी अशी जनतेतुन मागणी होतं आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!