वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे
बीड जिल्हयातील केज तालुक्यामध्ये एका छोटेशे गाव राजेगाव येथे जन्मलेले विनायक तुकाराम मेटे (३० जून १९७० – १४ ऑगस्ट २०२२) हे एक भारतीय राजकारणी आणि शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. ते मराठा आरक्षण आंदोलनातील महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. मेटे हे अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे अध्यक्ष देखील होते. त्यांच्या महत्वपुर्ण कामगीरीने अवघा महाराष्ट्र परिचित आहे .
त्यांच्या अपघाती निधनामुळे आज केज मध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली आणि शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पंचायत समीच्या सभागृहात पार पडला .या कार्यक्रमामध्ये केज तालुक्यातील सर्व पक्षाचे नेतेगण यांनी लोकनेते विनायकराव मेटे यांच्याबद्दल त्यांच्या राजकीय ,सामाजीक संघर्षावरती प्रकाश टाकला . या
शब्दपुष्प श्रद्धाजली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सामाजीक कार्यकर्ते प्रा.हानुमंत भोसले सर सर यांनी केले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!