क्राईमदेश

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर अज्ञातांन कडुन जीवघेणा हल्ला

वादळवार्ता – दिल्ली

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या देवबंद येथे पोहचताच भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. या हल्ल्यात आझाद जखमी झाले असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. चंद्रशेखर हे त्यांच्या वाहनाने देवबंद दौऱ्यावर जात होते. तेव्हा अचानक अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. गोळी स्पर्श करून गेल्याने त्यांना दुखापत झाली असून गाडीवर देखील गोळ्यांचे निशाण दिसत आहेत.

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये काही अज्ञातांनी हा हल्ला केला. “अर्ध्या तासापूर्वी चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर कारमधून आलेल्या काही लोकांनी गोळीबार केला. एक गोळी त्यांच्याजवळून गेली. ते आता ठीक असून त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी सीएचसीमध्ये नेण्यात आले आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत”, अशी माहिती एसएसपी डॉ विपिन टाडा यांनी दिली.

दरम्यान, चंद्रशेखर आझाद यांनी या हल्ल्याबद्दल म्हटले, “मला आठवत नाही पण आमच्या लोकांनी त्यांना ओळखले आहे. त्यांची गाडी सहारनपूरच्या दिशेने गेली. आम्ही यू टर्न घेतला. आमची गाडी एकटी होती, ते एकूण ५ जण होते. आमच्या सहकारी डॉक्टरांनाही गोळी लागली असेल.”

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!