आजच्या महिलांनी माता रमाई सारखे कोहिनूर हिरा घडवण्यासाठी कार्य करावे….. रंजीत घाडगे
वादळवार्ता – केज
दि ७. रोजी कुंबेफळ येथे माता रमाई आंबेडकर यांची १२५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली..
सदरील माहिती अशी की, आज संपूर्ण देशात माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात येते. सन १८९८ रोजी माता रमाई यांचा जन्म झाला व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी विवाह झाला. अत्यंत हालाकिची परिस्थिती असून त्या परस्थिती वर मात करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणात कोणतीही अडचण येऊ दिली नाही. आपले मुल मातीआड गेली पण या हजारो मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना मोठ्या प्रखरपणे साथ दिली.. बाबासाहेब आंबेडकर यांंना या देशाचे कोहिनूर हिरा घडवण्यासाठी माता रमाई अहोरात्र मेहनत घेतली त्या प्रमाणे आजच्या महिलांनी कार्य केले पाहिजे असे घाडगे रंजीत यांनी आपल्या मनोगतात सांगितले….
सर्व प्रथम पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.व डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले..बौध्दाचार्य अरुण पटेकर यांनी सामुदायिक त्रिशरण पंचशील घेण्यात आली.तसेच लहान मुलिंनी मनोगतात व्यक्त केले…या वेळी गावातील बौद्ध उपासक व उपासीका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहुल पटेकर,अशोक गायकवाड,अविनाश गायकवाड,किशोर पटेकर,सुनील पटेकर,दीपक पटेकर,महावीर पटेकर,दीपक सिरसट,जालिंदर पटेकर,संजीवन पटेकर, कुमार पटेकर,रोहित सिरसट,गणेश पारवे,ईश्वर पारवे,वैभव गायकवाड,सुमन पटेकर,वंदना गायकवाड,पूजा पटेकर, वंदना पटेकर,दिपाली पटेकर,कांताबाई पटेकर व सर्व बौद्ध उपासक व उपासीका मोठ्या संख्येने उपस्थित होते…व आभार राहुल पटेकर यांनी मानले….
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!