वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
गोवंश हत्याबंदी असतानाही केज तालुक्यातील साळेगांव येथील आठवडी बाजारातून दहा गाई व एक बैल उस्मानाबाद येथे कत्तलीसाठी घेऊन जात असताना सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने माळेगाव येथील शिवाजी चौकात पकडला.
गुरुवार १ सप्टेंबर रोजी साळेगांव ता. केज येथील आठवडी बाजारातून दहा गाई व एक बैल हे एका आयशर टेम्पो क्र. (एम एच-८/एच-७३९७) मध्ये भरून ते गोवंश हे उस्मानाबाद येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती एका गुप्त खबऱ्याने सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच सहाय्यक पोलीस फौजदार मुकुंद ढाकणे, बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर ,रामहरी भंडाने आणि सचिन अहंकारे यांच्या पथकाने सायं. ६:३० वा. केज कळंब दरम्यान माळेगाव येथील शिवाजी चौकात सापळा लावून सदर आयशर टेम्पो अडवला. त्याची पहाणी केली असता; त्यात दहा गाई व एक बैल अशी ११ गोवंशाचे प्राणी आढळून आले या बाबत वाहन चालक अझीम नईम काझी रा. उस्मानाबाद याची अधिक चौकशी केली असता त्याने माहिती दिली की, उस्मानाबाद येथील व्यापारी इमरान गफार पठाण या व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून साळेगाव येथील आठवडी बाजारातून ही जनावरे भरून उस्मानाबाद येथे कत्तल करण्यासाठी घेऊन जाण्यात येत होती.
पोलीस पथकाने जनावरसह वाहन ताब्यात घेतले. ही जनावरे २ लाख २५ हजार व आयशर टेम्पो ३ लाख रु. असा एकूण ५ लाख २५ हजार रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.

या प्रकरणी वाहन चालक अझीम नईम काझी आणि व्यापारी इमरान गफार पठाण दोघे रा. उस्मानाबाद यांच्या विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!