वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
गाडीची प्रतीक्षा करीत असलेल्या २१ वर्षीय विवाहितेच्या विनयभंग प्रकरणातील तिघा नराधमांच्या केज पोलिसांच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातही माहेरी आलेली २१ वर्षीय विवाहित महिला दि.१७ ऑगस्ट रोजी परत पुणे येथे जाण्यासाठी केज-बीड महामार्गावरील बरड फाटा येथे गाडीच्या प्रतीक्षेत तिच्या दोन भावा सोबत थांबली होती. त्या वेळी हनुमंत ज्ञानोबा मुंडे ( रा. मुंडेवाडी ता. केज ), बाबुराव आप्पाराव ढाकणे, पंढरी अशोक ढाकणे ( दोघे रा. सारूळ ता. केज ) व इतर अनोळखी असे पाच जण तिथे आले. त्यांनी या महिलेस पाहून अश्लील बोलत तिचा विनयभंग केला. तिच्या भावांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता एका भावास लोखंडी पट्टी डोक्यात मारून डोके फोडले. तर दुसऱ्या भावास पाठीत दगडाने मारहाण करून मुक्कामार दिला. या वेळी तिचा पती ट्रॅव्हल्समधून आला असता तिच्या पतीला ट्रॅव्हल्स मधून खाली ओढून या पाच जणांनी लाथाबुक्याने मारहाण केली. अशी फिर्याद पीडित महिलेने केज पोलिसांना दिल्या वरून हनुमंत मुंडे, बाबुराव ढाकणे, पंढरी ढाकणे व इतर अनोळखी दोघे अशा पाच जणां विरुद्ध केज पोलिसात गु. र. नं. ३४८/२०२२ भा. दं. वि. ३५४, ३२४, ५०४,१४३ आणि १४९ गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी त्यांच्या अधिनिस्त अधिकाऱ्यांना त्या नराधमांना तात्काळ जेरबंद करण्याचे आदेश दिले. पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि पोलीस जमादार अभिमान भालेराव, मेसे, शेख रशीद यांनी दि. २१ ऑगस्ट रविवार रोजी त्यांचा तपास करून नराधम आरोपी हनुमंत मुंडे, बाबुराव ढाकणे, पंढरी ढाकणे यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या प्रकरणातील आरोपींना तात्काळ ताब्यात घेतल्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!