वादळवार्ता / केज
पेपरला आलेल्या बातमीच्या कात्रणाचा फोटो फेसबुकला अपलोड करत मजुकर टाकला असता केज येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे कि केज नगरपंचायतचे माजी दलित नगरसेवक कपिस मस्के यांनी दि.१५ सप्टेंबर रोजी आपल्या फेसबुक अंकाऊट वरून ” केज येथील गायरान जमीन ३०/१ च्या गैरव्यवहार प्रकरणी वृत्तपत्रास आलेल्या “चुकीचा एन.ए. दाखवून गायरान लुटले ” या मथळ्याखाली बातमीचे कात्रण फोटो चार शब्दांच्या मजकुरासह फेसबुक वरती पोस्ट केली असता. समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून जलालोद्दीन मुन्नुमिया इनामदार यांच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात माजी दलित नगसेवक कपिल मस्के विरुद्ध भारतिय दंड संहिता १८६० नुसार कलम ५०० ,५०१ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
काय आहे केज येथील ३०/१ गायरानाचे जमीनीचे प्रकरण, बातमी ?
चुकीचा एन ए दाखवून गायरान विकले
केज येथील राज्य महामार्ग लगत शारदा इंग्लिश स्कूल च्या समोर असलेले ३०/१ गायरान हे अमृत किसन लांडगे यांच्या नावाने शासनाकडून मंजूर झाले होते. त्यानंतर उमर मुस्ताक फारोखी व अमृत लांडगे यांनी अदलाबदल करून जमीन केजचे गायरान हे उमर फारोकीच्या नावे झाले तर येवता येथील उमर फारोकी यांची जमीन अमृत लांडगे यांच्या नावे झाली.
त्यानंतर या जमीनीचे प्लॉट पाडण्याच्या हेतूने उमर फारोकीने त्या जमीनीचा एन ए ले आऊट करून घेतला.पण या मध्ये जनविकास इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि मार्फत हारून इनामदार व आनंद बिरदीचंद बलाई यांना ५० गुंठे जमीन शेतीसाठी विक्री केली होती .त्यानंतर ही जागा हारून इनामदार व आनंद बलाई यांने इंदु पांडुरंग वेताळ, रेणुका विलास व्हेनमाने, शंशीकांत हरिभाऊ केंद्रे, सायस हरिभाऊ केंद्रे, स्नेहल हरिभाऊ केंद्रे.इनामदार महेबूबमियाँ बाबामियाँ,मनीषा जयदेव घुले. या सर्वाना उमर फारोकीच्या नावे असलेले एन ए लेआऊट व चतुरसीमा वेगवेगळी दाखवून बोगस रजिस्ट्री करून दिली असा आरोप उमर फारोकी यानी केला आसुन ते आता मे.दिवानी न्यायाधीश साहेब व स्तर अंबाजोगाई यांच्या न्यायालयात रे.दि.दा.नं.७१/२०२३ या प्रमाणे दावा दाखल केला असून सबस माहितीस्तव सर्व जनतेस कळविण्या साठी जाहीर प्रगटन सर्व वर्तमानपत्रात दिले आहे.व वरिल व्यक्ती सोबत खरेदी विक्रीचा व्यवहार केल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस आपण जबाबदार रहाल याची नोंद घेण्याचे आव्हान उमर फारोकी यांनी केले आहे.
या आशयाची बातमी वृत्तपत्रात दि.१५ सप्टेंबर रोजी छापून आलेली होती. याच वृत्तपत्राचे कात्रण फोटो पोस्ट करत मजकुर टाकला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला असून यामागील मास्टरमाईंड कोण ? केज येथील गायरानाचा नेमका काय गोडबंगाल आहे ? आदि प्रश्नावर केज शहरात तथा फुले नगरमधील प्रभाग ७,८,९ मधील नागरिकात जोराची चर्चा सुरू आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!