आपला बीड जिल्हाक्राईम

गाडी बाजूला घे म्हणताच डॉक्टरला तिघांनी ठोकले !

वादळवार्ता वार्तांकन

गल्लीतील रस्त्यात उभी केलेली गाडी बाजूला घ्या; असे म्हणताच तिघांनी एका डॉक्टरला ठोकल्याची घटना घडली आहे.

सोमवार दि. २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:०० वा च्या दरम्यान केज येथील समर्थ नगर मध्ये पहिल्या गल्लीत रस्त्यात उभी केलेली गाडी बाजूला घ्या. असे डॉ. मिलिंद जाधव हे एकास म्हणाले. त्याचा राग येऊन लक्की , ठोंबरे आणि अन्य एकाने डॉ. मिलिंद जाधव यास शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

डॉ. मिलिंद जाधव यांच्या फिर्यादी वरून लक्की , ठोंबरे आणि अन्य एका अनोळखी विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४८६/२०२२ भा. दं. वि. ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार श्रीकांत चौधरी हे पुढील तपास करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!