केज नगरपंचायतच्या कारभारावर खेद व्यक्त करत नगसेविकाने स्वखर्चातुन केले 100 फुटाचे नाली बांधकाम
वादळवार्ता वार्तांकन – केज
सविस्तर वृत्त असे की केज नगरपंचायत नगरसेविका तरमिम बेगम गजमफर या केज शहरातील एकुण १७ प्रभागापैकी प्रभाग क्रमाक 11 मधुन निवडुन आल्या असुन वेळोवेळी प्रभागातील समस्या केज नगरपंचायतच्या प्रशासनास निर्देशनास आणुन देत होत्या यासाठी त्यांनी मुख्याधिकारी तथा नगराध्यक्षा यांना वारंवार निवेदने दिली होती परंतु केज नगरपंचायतच्या प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले म्हणुन नगरसेविका तरमिम बेगम गजमफर यांनी प्रभागाचा विकास स्वखर्चातून करण्याचे ठरवुन स्वःताच्या प्रभागातील 100 फुटाच्या नालिचे बांधकाम केले आहे .
याकरिता प्रभागातील वजाद भाई खुरेशी,सागर काळे,हकीम भाई,शिवाजी सौदागर,जीवन भाऊ आदिनी आभार करत अभिनंदन केले आहे.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल निर्भीड नगरसेविका तरमिम बेगम गजमफर यांची प्रभागासह संपूर्ण केज शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.