आपला बीड जिल्हा

गेवराई तालुक्यात शिक्षणाची वाट लावणारे महाभाग

वादळवार्ता वार्तांकन – गणेशभाऊ ढाकणे

गेवराई तालुक्यात दिर्घ वास्तव्यास एकाच शाळेत असणारे शिक्षक व वारंवार शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवणारे व शिक्षण विभागाचे सर्वेसर्वा स्वतःला समजणारे महाभाग स्वतःची संस्था उघडून गेवराई तालुक्याचे वाटोळेच करायला निघालेत. अधिका-यांच्या आर्शिवादाने काही शिक्षकांनी शाळेवर महिन्याने गडी लावून शिकवायला सुरुवात केली आहे तर काही शिक्षकांनी स्वतःची पतसंस्था / मल्टिस्टेट बँका काढून जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचे वाटोळे केलेले आहे. काही महाभाग शिक्षक स्वतःची संस्था काढून गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा हया बंद पाडण्याच्या मार्गांवर निघालेले आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांनी जिल्हा परिषद मधील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण द्यायचे सोडून कोल्हेर रोड, गेवराई येथील संस्थेच्या शाळेत उरले सुरले शिक्षक सुध्दा कारभारात गुंतले असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या कमी होत असून त्यांच्या संस्थेच्या पट वाढताना दिसून येत आहे. पगार घ्यायचा जिल्हा परिषद शाळेमधून आणि काम करायचे स्वतःच्या संस्थेचे व बँकेचे हाच धंदा सध्या गेवराई शहरातील कांहि शिक्षकांनी सुरु केल्याचे दिसून येत आहे.

शिक्षणाचा बाजार मांडून हे शिक्षक गोरगरीब जनतेच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण न देता जिल्हा परिषद शाळा मोडीत काढून बंद पाडल्याच्या मार्गावर असल्याचे हे महाभाग दिसून येत आहे आणि याकडे मात्र लोकप्रतिनिधी मा. आमदार साहेब तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांचे दुर्लक्ष आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!