Uncategorized

केज शहरात टेम्पो व दुचाकीची धडक ; तरुण ठार

वादळवार्ता – केज दि.२३

केज- बीड रोडवर दि. २२ जुलै रोजी रात्री १० वाजता टाटा कंपनीचा टेम्पो क्र.MH14KA3241 व मोटर सायकल क्र.44AA9591 यांचा स्वागत हॉटेलच्या समोर अपघात झाला असुन मोटार सायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. जोराचा आवाज आल्याने अपघात स्थळी नागरीकांनी धाव घेत रुग्णवाहीका व पोलिस प्रशासनास संपर्क साधत जखमी मोटार सायकल स्वार अजय देविदास गायसमुद्रे रा. खोडस याला प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल केले परंतु गंभीर दुखापत असल्याने त्यास पुढील उपचारासाठी स्वराती रुग्णालय अंबाजोगाई येथे दाखल केले असता उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यु झाला आहे.

महत्वाचे म्हणजे सदरील तरुण आपल्या मामाच्या मुलीचे लग्न दि २३ रोजी दुपारी १२ वाजता असल्याने मुलीच्या लग्नाचे व्यवस्थापन करण्याकरिता रात्री १० वाजता तिरुपती मंगल कार्यालय केज कडे चालला होता . परंतु मध्येच अपघात झालेमुळे त्यामध्ये त्याचा मृत्यु झाला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!