आपले केजक्रीडा

सर्वेसर्वा इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय ढकली व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन…

बीड जिह्याचे सिंघम खा.बजरंग सोनवणे करणार उद्घाटन

केज । प्रतिनिधी

सेवानिवृत्त नायब तहसिलदार तथा शरदचंद्र पवार पक्षाचे बीड जिल्हा किसान सेलचे सर्वेसर्वा जिल्हाध्यक्ष सी.बी .एस इनामदार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय ढकली व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये भरगच्च बक्षीसे ठेवण्यात आली आहेत त्यामध्ये प्रथम ११००० रुपये, व्दितीय ९०००, तृतीय ७०००, चतुर्थ ५०००, पाचवे ३००० तर सहावे २५०० व सातवे २००० आणि आठवे ११०० रुपये आहे. तसेच क्रिडा क्षेत्रामध्ये मौल्यवान कामगीरी करणाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे.

हा सत्कार शरदचंद्र पवार पक्षामध्ये एकनिष्टपणे कार्य करणारे युवराज मगर यांच्या मित्रमंडळांच्या वतीने करण्यात येणार असून यामध्ये पक्षाचे एकनिष्ट असणारे व जिह्यात कर्तव्यदक्षपणे कार्य करणारे सी.बी .एस इनामदार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन या सर्धेचे आयोजन युवराज मगर यांनी केले आहे . सदरील स्पर्धचे उद्घाटन दि.२५ एप्रिल २०२५ सायं ७ वाजता होणार असून खा. बजरंग सोनवणे या स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत तरी व्हॉलीबॉल संघाच्या नोंदनिसाठी ७८७५९७१६१६ ,९५२७०३९००४ नंबरवती संपर्क साधावा तसेच बीड जिल्हा तथा केज तालुक्यातील पेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शरदचंद्र पक्षाचे एकनिष्ठ असणारे प्रा. युवराज मगर सर यांनी केले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!