वादळवार्ता – गौतम बचुटे
केज-बीड रोडवरील केज पासून अवघ्या काही अंतरावर एका भरधाव कारच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
केज-बीड रोडवर गंगा माऊली साखर कारखान्या जवळ असलेल्या उमरी फाट्यावर बीड येथील दवाखाण्यातून एका आजारी रुग्णाला घेऊन अंबाजोगाईकडे जाणाऱ्या भरधाव कार क्र. (एम एच-४४/एस/१६४४) ने मंगळवारी दि.२९ रोजी रात्री ८:३० वा. सुमारास रस्ता वैजयंती शिंदे (रा. उमरी पाटी) या रस्ता ओलांडीत असताना त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत वैजयंती शिंदे या जागीच ठार झाल्या. अपघाताची माहिती मिळताच केज पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी धाव घेत अपघातातील कार ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणण्यात आली. तर मयत महिलेचे पार्थिव उत्तरीय तपासणी आणि शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालया केज येथे पाठवण्यात आले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!