आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

बीड रोडने वॉकिंग करताना पाठीमागुन होन्डाई कारने दिली जोराची धडक

वादळवार्ता – केज

राष्ट्रीय महामार्गाचे मजबुतीकरण , रुंदीकरण झाल्यानंतर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येत आहे.

 याबाबत माहिती अशी की केज शहरात रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे वास्तव्यास असणारे मुरलीधर रामभाउ रोकडे वय 63 वर्ष धंदा सेवानिवृत्त हे नित्य नियमाप्रमाणे वॉकिंग करण्यासाठी दि.15 मे सकाळी 6 वाजता घराबाहेर पडले होते. केज शहरा मधील ढाकणे कॉम्प्लेस येथून दुध घेवून वॉकींग करत घरी जात असताना 06:30 च्या सुमारास बीएसएनएल टॉवर (BSNL) येथे आले असता पाठीमागुन येणार्‍या पांढ-या रंगाच्या होन्डाई कंपनीच्या कार क्र. एमएच 4422168 अचानक पाठीमागून जोराची धडक देऊन पलायन केले मुरलीधर रामभाउ रोकडे  रोडच्या कडेला पडल्याने त्यांच्या हाताला पायाला खरचटले व दुखापत झाली तसेच त्यांच्या डाव्या बरगडीला मानेच्या मनक्याला गंभीर मुक्का मार लागल्याने त्यांना उठता येत नव्हते. स्थानिकांच्या मदतीने त्यांच्या मुलास संपर्क करून तात्काळ त्यांना प्राथमिक उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय केज येथुन स्वराती रुग्णालय अंबाजोगाई मधुन पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झालाने परत सहयाद्री हॉस्पीटल शास्त्री चौक येरवडा, पुणे येथे अडमिट केले असून  मुरलीधर रोकडे याच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात दि. 29 मे रोजी आज्ञात कार चालका विरुद्ध भादवि प्रमाणे कलम 279,337,338 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!