आपला बीड जिल्हाआपले केज
केज नगराध्यक्षा, स्वीकृत नगरसेवक हाजिर हो sssss !

जिल्हाधिकारी बीड यांनी काढले फर्माण
विनापरवाना बांधकाम ,गायरान जमीन प्रकरण
वादळवार्ता – केज
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ४४ ई व ४४ नुसार केज नगराध्यक्षा सिता प्रदीप बनसोड तथा स्वीकृत नगसेवक हारुण इनामदार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी करिता हाजर राहण्याची दोन वेगवेगळ्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. 
याबबत सविस्तर वृत्त असे कि फुले नगर येथील प्रभाग क्र ७ मधुन अनुसूचीत जातीच्या आरक्षित जागेवरून निवडुन आलेल्या तथा केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सिता प्रदीप बनसोडे यांचे प्रभाग ७ मधील असणार्या जागेवर (घर क्र.३१३१) बांधकाम परवाना न घेता विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी तसेच सर्वे न. ३०/१ मधील गायरान जमीनीवर ले-आऊट व एन-ए न करता जनविकास इन्फ्रा कंपनीव्दारे खरेदी करुण अवैद्यरित्या रजिट्री करूण विक्री केल्याप्रकरणी केज नगरपंचायतचे माजी नगरसेवक कपिल मस्के यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे नामे नगराध्यक्षा सिता प्रदीप बनसोड व स्वीकृत सदस्य हारुण इनामदार यांच्या विरुद्ध दावा केला होता . त्या अनुशंगाने जिल्हाधिकारी बीड यांनी दि. २५ एप्रिल मंगळवार रोजी ०४ वाजता सुनावणीची तारीख निश्चित करुण सुनावणीस हाजर राहण्याचे फर्माण काढले आहे.सदर सुनावणीस आपण स्वतः तथा आपल्या विधीज्ञा मार्फत सर्व कागदपत्रासह हजर राहून लेखी व तोंडी म्हणणे सादर करावेत, सुनावणी दिवशी उपस्थित न राहिल्यास आपल्यास काही म्हणावयाचे नाही, असे गृहीत धरून पुढील कारवाई करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमुद करण्यात आले आहे.
यामुळे याची सर्वत्र चर्चा असुन सदरील सुनावणी कडे केज शहरातील तथा तालुक्यातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.
सत्ताधार्यान कडून प्राथमिक सुविधा सोडवण्यापेक्षा स्वताच्या सुविधांनकडे लक्ष असलेमुळे केज नगरपंचायता ढिसाळ कारभार सुरु आहे. मी सर्व पुराव्यानिशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या कायद्याप्रमाणे संविधानीक लढाई लढणार .
कपिल मस्के
मा.नगरसेवक न.प. केज



