आपला बीड जिल्हाक्राईम

पुत्र झाला ऐसा गुंडा ; त्याने घातला आईच्या डोक्यात दांडा !

शेत नावावर करण्यासाठी मुलाने केली आई-वडिलांना मारहाण !

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. असे एक संतवचन आहे. परंतु हल्ली आता आई-वडिलांना मारहाण करण्याच्या अनेक घटना घडत आहेत. केज तालुक्यात अशीच एक घटना घडली. त्यामुळे आता त्या आई-वडिलांवर असे म्हणावे लागण्याची वेळ आली आहे की, पुत्र झाला ऐसा गुंडा; ज्याने घातला आईच्या डोक्यात दांडा.

साळेगांव ता. केज येथे रविवार दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३० वा लिंबराज गुंडीबा बचुटे याने त्याचे वडील गुंडीबा बचुटे आणि सावत्र आई शांताबाई बचुटे यांना शेत नावावर का करीत नाहीत. म्हणून त्यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सावत्र आई शांताबाई बचुटे हिच्या डोक्यात लाकडी दांडा मारून दुखापत केली.

शांताबाई बचुटे यांच्या तक्रारी वरून सावत्र मुलगा लिंबराज बचुटे याच्या विरुद्ध दि. २३ ऑक्टोबर रोजी केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४८१/२०२२ भा. दं. वि. ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे हे पुढील तपास करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!