सामाजीक
फुलेनगरच्या सामाजिक व धार्मिक कार्यात वाहून घेणाऱ्या सत्यभामा लक्ष्मण भडके यांचे दुःखद निधन
संपूर्ण परिसरात शोककळा पसरली

केज । प्रतिनिधी
फुलेनगर येथील सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग असलेल्या सत्यभामा लक्ष्मण भडके (वय ७८) यांचे दि. १५ मे रोजी रात्री ८.३० वाजता फुलेनगर येथील राहत्या घरी हृदयविकाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, अनेकांनी एक सच्च्या समाजसेविकेला हरपल्याची भावना व्यक्त केली आहे. सत्यभामा भडके या गेल्या अनेक वर्षांपासून फुलेनगर परिसरात विविध सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरण, तसेच भारतीय बौद्ध महासभाच्या माध्यमातून सक्रिय सहभागी होत्या. त्यांनी अनेक महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरणा दिली असून, त्यांच्या कार्यामुळे त्या परिसरात एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात होत्या.
त्यांच्या अंत्ययात्रेसाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी उपस्थित राहून त्यांना शेवटचा निरोप शेलुअंबा ता . अंबाजोगाई सार्वजनिक स्मशानभूमित देण्यात आला.त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
माझ्या धार्मिक , सामाजीक, राजकीय जडणघडणीमध्ये सिंहांचा वाटा असणाऱ्या कालकथित सत्यभामा लक्ष्मण भडके (बाय ) यांच्या जाण्याने फुलेनगवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असुन त्याच्या कार्य विचारांना व स्मृतींना विनंम्र अभिवादन .
कपिल मस्के
मा. नगरसेवक केज न.प.