आपला बीड जिल्हा

98 लाखाचा निधी 6 महिने ठेवला गुलदस्त्यात ; कळवला नाही केज न.प.ने केज शहरातील वस्त्यात !

प्रशासनास जागे करण्यासाठी संघर्ष समीतीचे 1 नोव्हेंबर रोजी घंटानाद अंदोलन

वादळवार्ता वार्तांकन – अजय भांगे

केज शहरातील उमरी रस्त्यासाठी प्रशासकाच्या समोर वेळोवेळी मोठ्या प्रमाणात अंदोलने झाली आहेत.

याच अंदोलनच्यामुळे केज नगरपंचायत वरती प्रशासनाचा कारभार असताना त्या काळातील केजचे भुमीपुत्र असलेले केज नगरपंचायतचे मुख्याधिकारी सचिन देशपांडे यांनी सदरील उमरी रस्त्यासाठी केज नगरपंचायतच्या अंतर्गत अंदाजपत्रकीय 98 लाखाचा प्रस्ताव सादर केला होता . नगरपंचायत प्रशासकीय आदेश 18/10/2021 प्रमाणे त्यास मान्यता दिली आहे.

परंतु निधी येऊन सहा महीने उलटले तरी त्याला कार्यालयीन गती देण्यात आली नाही.

ज्या संघर्ष समितीने वेळोवेळी आंदोलने उभी केली पाठपुरावा केला त्या संघर्ष समितीला वा नागरीकांना देखील न कळवीता मंजुर निधी पत्र गुलदस्यात ठेवण्यात आले म्हणुन उमरी रस्त्यासाठी आलेल्या मंजुरी पत्राप्रमाणे आठ दिवसात तात्काळ कामे सुरु करावीत अन्यथा केज नगरपंचायत कार्यालया समोर दि.01 नोव्हेबर रोजी घटांनाद आंदोलन करण्यात येईल असा ईशारा केज संघर्ष समितीचे सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले सर, नासेर मुंडे यांनी केज नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना एका लेखी निवेदनाव्दारे करण्यात आला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!