आपला बीड जिल्हा

पाटोदयातील वाढते अपघात टाळण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवा – नगरसेवक राजू भैय्या जाधव

नगरपंचायत मासिक सभेत केली मागणी

वादळवार्ता – पाटोदा /(प्रतिनिधी)

शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवरील अवजड वाहने,बे जबाबदार चालकांच्या दुर्लक्षामुळे पाटोदयात मागील काही महिन्यांपासून अपघाताचे प्रमाण वाढले असून त्यामध्ये अनेकांचा नाहक बळी गेलाय. शिवाय मागील काही महिन्यांपासून रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होतच आहेत, ही मोठी चिंतेची बाब आहे. याचे विशेष कारण म्हणजे शहरातील मुख्य रस्त्यावर कुठेही गतिरोधक दिसत नाही.यामुळे चुंबळी फाटा,जय भवानी काॅलेज, छत्रपती शिवाजी महाराज चौक,बस स्टँड, नगरपंचायत, तहसील रोड,पारगाव रोड,कोर्ट रोड,बामदळवाडा रस्ता,ग्रामीण रुग्णालय, तसेच पाटोदा शहरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी जिथे विद्यार्थी,शेतकरी वर्ग,कामावर जाणारा नोकरदार वर्ग यांची रेलचेल चालू असते या रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वेगाने वाहन चालक वेगाने गाडी चालवत असतात.

त्यामुळे पादचाऱ्यांना जीवावर उदार होऊन रस्त्यावर चालावे लागत आहे.वाढत्या अपघातांची संख्या पाहून पादचारी, सायकलस्वार, दुचाकी चालकांनी रस्त्यांवर फिरूच नये का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पाटोदा शहरात मागील काही महिन्यात अपघातात अनेक जनाना प्राण गमवावा लागला आहे तर कित्येक जन अपघातात जखमी झाले आहेत यामुळे पाटोदा शहरात अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवून वाहनांच्या वेगावर नियंत्रण करणे गरजेचे झाले आहेत.

वेगाची मर्यादा न पाळता वाहने दामटणाऱ्या वाहनचालकांना आवर घालण्यासाठी आणि होणारे अपघात टाळण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवा अशी मागणी नगरपंचायत मासिक सभेत नगरसेवक राजू भैय्या जाधव यांनी केली आहे

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!