आपला बीड जिल्हा

केज तालुक्यातील पत्रकारांचा प्रत्येकी एक लाखाचा विमा काढणार – रामदास तपसे

वादळवार्ता वार्तांकन – केज

पत्रकारांचे जीवन या युगामध्ये खडतर झालेले आहे म्हणून या मुद्यावर लक्ष केंद्रित करून केज तालुक्यातील सर्व पत्रकारांचा आपण प्रत्येकी एक लाख रुपयांचा विमा काढणार असल्याचे राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने आणि पत्रकार युवराज काकडे यांच्या नुकत्याच झालेल्या दुर्दैवी निधनामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा एक कार्यक्रम केजमधे आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने बोलताना डिजिटल मिडिया परिषदेचे अध्यक्ष रामदास तपसे यांनी पत्रकारांच्या हिताची ही घोषणा केली आहे.

या धावपळीच्या युगात पत्रकारांचे जीवन देखील दिवसेंदिवस धोकादायक होत चाललेले आहे. दुर्दैवाने जर एखादी वाईट घटना घडली तर त्या पत्रकार बांधवांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना काहींसा आर्थिक आधार मिळावा म्हणून केज तालुक्यातील सर्व पत्रकारांचा आपण स्वखर्चाने ग्रुप विमा काढणार असल्याचे पत्रकार रामदास तपसे यांनी सांगितले. राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने केज येथील शासकीय विश्रामगृहात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डिजिटल मिडीया पत्रकार परिषदेचे केजचे अध्यक्ष रामदास तपसे हे बोलत होते. ते यावेळी पुढे बोलताना म्हणाले की केज तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एक पासपोर्ट फोटो व पत्रकारीतेचे ओळखपत्र तसेच आधारकार्डची झेरॉक्स याकरीता आमच्याकडे जमा करावी. कागदपत्र जमा झालेल्या सर्व पत्रकारांचा विमा लवकरच काढला जाईल असे ते म्हणाले. पत्रकार रामदास तपसे यांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून घेतलेल्या या निर्णयाचे पत्रकार बांधवांनी स्वागत केले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार विजयराज आरकडे हे होते तर पत्रकार रमेश गुळभिले, दशरथ चवरे, दिनकर राऊत , प्रकाश मुंडे, अजय भांगे, सनी शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम बचुटे यांनी केले तर बाबासाहेब मस्के यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!