माहिती अधिकार दिन आंतरराष्ट्रीय महिती अधिकार दिन म्हणुन साजरा करावा – माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बीड
वादळवार्ता वार्तांकन – बीड
बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणुन साजरा करण्यात यावा असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे कि सर्वसामान्याचा असणारा कायदा म्हणुन माहिती अधिकार अधिनियम २००५ हा आहे.
शासकीय आदेश क्र. २००८ / प्र.क्र. ३७८/०८/ सहा नुसार तसेच महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क. संकीर्ण २०१५ /प्र.क्र. (२५२ /१५ ) दि.२८ /१ / २०१६ प्रमाणे बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी कार्यालयात २८ सप्टेंबर हा दिवस ” आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणुन साजरा करून बीड जिल्हात माहितीचा अधिकार अधिनियम २००५ या कायद्याच्या व्यापक प्रसिद्धीकरिता व प्रभावी अंमलबजावणी करिता जिल्हा स्तरावर सर्वतोपरी उपयोजना करण्याचे आदेश पारित करावे तसेच या दिवशी माहितीचा अधिकार अधिनियम या कायद्यातील तरतुदी आणी कार्यपद्धती विविध माध्यमातुन व्यापक प्रसिद्धी देऊन व विविध उपक्रम राबवुन बीड जिल्ह्यातील सर्व नागरीकांना माहिती मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालयात, उच्च व तंत्र शिक्षण विभाग व इतर शैक्षणिक संस्थामध्ये माहितीचा अधिकार या विषयावर आधारित प्रश्नमंजुषा चित्रकला निबंध व वकृत्व स्पर्धा यासारख्या स्पर्धा तसेच चर्चासत्र व्याख्यानमाला आयोजित करण्याचे आदेश पारित करावे यासह आदि मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांच्या वतीने देण्यात आले. निवेदनावरती माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बीड जिल्हाध्यक्ष अजय भांगे, बीड जिल्हा उपाध्यक्ष ऍड एच.एम.घाईतिडक , जिल्हा सरचिटणीस मुबोशीर खतीब, शिरूर तालुकाध्यक्ष परमेश्वर एस ढाकणे , अंबाजोगाई प्रचार प्रमुख सावंत दिगबंर, गेवराई मुख्य प्रचार संयोजक बाळु श्रीमंत तोडेकर , नेकनुर आर टी आय कार्यकर्ता शेख शाकेर आदिच्या निवेदनावरती सह्या आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!