वादळवार्ता वार्तांकन – केज
केज बीड महामार्गावर मस्साजोग येथील पेट्रोल पंपाजवळ ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि मोटार सायकलच्या अपघातात मोटार सायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे.

केज तालुक्यातील पिसेगाव येथील आकाश राजाभाऊ नेहरकर हा तरुण रविवारी रात्री दुचाकीवरून (एम एच-४४/ जे-७४३५) मांजरसुंब्या कडून केजकडे येत होता. या रस्त्यावर मस्साजोग जवळील देशमुख पेट्रोल पंपा समोर त्याची दुचाकी आली होती. त्याच्या समोर ऊस भरलेले ट्रॅक्टर (एम एच-२५ /जी-२२८१) हे गंगा माऊली साखर कारखान्याकडे चाललेले होते. याच वेळी दुचाकीची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक बसल्याने या अपघातात दुचाकीवर आकाश राजाभाऊ नेहरकर हा तरुण गंभीर जखमी जागीच मरण पावला.
या घटनेची माहिती मिळताच मस्साजोग बिटचे जमादार त्रिंबक सोपणे, पोलीस नाईक महादेव बहिरवाल यांनी घटनास्थळी धाव घेतली.