वादळवार्ता – बीड
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड जिल्हा आयोजित सभा बीड जिल्ह्याचे विकासाची अस्मितेची सन्मानाची आणि दुष्काळ मिटवण्यासाठीची जाहीर सभा रविवार दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3.00 वाजता स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बीड येथे संपन्न होणार आहे.
या सभेस प्रमुख मार्गदर्शन म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजिदादा पवार साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. प्रफुल पटेल साहेब, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा.ना. दिलीप वळसे पाटील साहेब, महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. ना. छगन भुजबळ साहेब, महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा.ना. धनंजय मुंडे साहेब, महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री मा. हसन मुश्रीफ साहेब, महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री मा.ना. धर्मराव बाबा आत्राम साहेब, महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा.ना. अनिल भाईदास पाटील साहेब, राज्याचे क्रीडामंत्री मा.ना. संजय बनसोडे साहेब, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, माजी आमदार अमरसिंहभैय्या पंडित, आ. बाळासाहेब काका आजबे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, युवा नेते योगेश भैय्या क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तरी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांनी केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!